महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश, घेरारसाळगड भराडे धनगरवाडी जोड रस्त्यावरील दगडी बांध जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काढून टाकला

ग्रामपंचायत निवडणुकीत धनगर समाजाच्या महि‌लेने प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुक लढविल्याने गावातील काही प्रतिष्ठीत गांव पुढा-यांनी मनात राग ठेऊन भराडे धनगरवाडी‌ला जोडणारा रस्ता निवाचीपट्टी जवळ दिनांक सात मार्च पासून दगडीबांध घालून अडविला होता.रस्ता अडविल्याने भराडेवाडीतील धनगर बांधवांची गैरसोय होत होती
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना धीर देऊन स्वत: रस्ता खुला करून देण्याची जबाबदारी स्विकारली.व शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला..
खेड तालुक्याच्या कार्यक्षम तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी घोरपडे मॅडम यांनी दिनांक २१ जुन रोजी पहिली सुनावणी लावली होती.या सुनावणी साठी रस्त्यावर दगडी बांध घालणारे 1) संतोष यादव.2) जि प बांधकाम उप अभियंता मंगेश खेडेकर 3) ग्रामपंचायत घेरारसाळगड चे ग्रामसेवक,सरपंच व 4) महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांना नोटीस बजावून निमंत्रित करण्यात आले होते.या सुनावणीत सदर रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याने व यापुर्वी शासकीय निधी खर्च झाल्याने जि प बांधकाम विभागाने तात्काल रस्त्यावरील दगडी बांध हटवून रस्ता नागरीकांना मोकळा करून द्यावा असा मा.तहसिलदार मॅडमनी आदेश जि प बांधकाम विभागाला दिला.
सुनावणीत मा.तहसिलदार मॅडम यांनी दिलेल्या आदेशाचे जि प बांधकाम विभागाने जबाबदारीने पालन करून दिनांक २२ जुन रोजी मा.सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,कोतवाल ग्रामपंचायत घेरारसाळगड यांच्या साक्षीने भराडे धनगरवाडी जोड रस्त्यावरील दगडी बांध हटवून रस्ता नागरीकांना वाहतुकीसाठी मोकळा करून दिला आहे.
रस्त्यावरील दगडी बांध हटवल्याने भराडे धनगरवाडीतील नागरीकांनी प्रशासनाचे व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी या संघटनेचे विशेष आभार मानले आहेत.तसेच हा संघर्ष लढण्यास भराडे धनगरवाडीतील ग्रामस्थांनी सयंम ठेवून व एकजुटीने संघटनेला साथ दि‌ल्याबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी भराडे धनगरवाडीतील सर्व समाज बांधवांचे आभार मानले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button