
युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
मुंबई : भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंग निवृत्ती घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यानं ही घोषणा केली. त्याने 2012मध्ये अखेरची कसोटी, तर 2017मध्ये अखेरच्या मर्यादित षटकांचा सामना खेळला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता… 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला.