
राजू शिंदेंसह तब्बल 18 जण भाजपला सोडचिठ्ठी देणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे राजू शिंदेंसह तब्बल 18 जण भाजपला सोडचिठ्ठी देणार आहे.राजू शिंदे हे 6 नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत काही पदाधिकारीही ठाकरे गटात सहभागी होणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




