
आज टास्क फोर्ससोबत बैठकीनंतर लॉकडाऊन बाबत निर्णय जाहीर हाेणार
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊन ही लागू करण्यात आला आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज यासंदर्भात टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल आहे
www.konkantoday.com