लोटे एमआयडीसीचा पाणी पुरवठा सुरळीत , उद्योजकांचे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज

चिपळूण: अखेर तीस तासानंतर लोटे एमआयडीसीचा आणि बारा गावाचा पाणी पुरवठा सुरळीत झाल आहे मात्र असे असले तरी पाईप फुटीचे संकट मात्र अद्यापही कायम आहे. लोटे एमआयडीसी आणि तेथील बारा गावांना पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पेठमाप येथे फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेले आहे रविवारी दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाईप लाईन फुटल्याने लोटे एमआयडीसीच्या कारखान्यावर परिणाम झाला तर बारा गावातील जनतेला पाणी पाणी करण्याची वेळ आली होती तीस वर्षे जुनी असणारी पाईप लाईन जागो जागी फुटत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी ही करण्यात आल्या आहेत. पेठमाप येथे पाईप लाईन फुटताच एमआयडीसीचे सह्ययक अभियंता श्री. अरविंद पवार आणि किशोर हळदणकर यांनी तात्काळ येथील ठेकेदार दशरथ दाभोळकर यांच्या माध्यमातून काम सुरू केले प्रसिद्ध ठेकेदार आर. जी. कुलकर्णी यांच्या सहकार्याने पाईप लाईन फुटल्या नंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम चार वाजल्यापासून सुरू केले सायंकाळी सुरू केलेले काम दिवस रात्र करीत सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण करण्यात आले . पाईप लाईन फुटली असली तरी त्या ठिकाणी तिला न जोडता सोळा मीटरची पाईप लाईन पूर्ण बदलण्याचा निर्णय घेत अनेक अडचणींचा सामना करीत नवीन पाईप बसवण्यात आला आहे. १९८२ साली हि पाईप लाईन टाकण्यात आली आहे मात्र अद्याप बदलण्यात न आल्याने गत महिना दीड महिना ती ठीक ठिकाणी फुटत आहे त्यामुळे पाणी वाया जात असताना त्याचा परिणाम लोटे औधोगिक क्षेत्रावर होत असून बारा गावातील लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ येत आहे सध्या पाणी पुरवठा सुरळीत झाला असला तरी ही पाईप अन्य कुठे तरी फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या मुळे बारा गावातील जनता आणि लोटे औधोगिक वसाहतीवरचे पाणी संकट मात्र अजून टळलेले नाही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे पाण्याचा फटका आणि लाखो रुपयांचे नुकसान लोटे औधोगिक वसहतील सोसावे लागत आहे तर बारा गावातील जनतेला पाणी पाणी करावे लागत असल्याने कायमस्वरूपी तोडगा काढणायची मागणी होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button