
जिल्हा बँकेला शासनाचा सहकार भूषण पुरस्कार आता सहकारमहर्षी पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न -तानाजीराव चोरगे
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याने राज्य शासनाने बँकेला सहकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आता यापुढील प्रतिष्ठेचा असलेला सहकार महर्षी पुरस्कार मिळण्यासाठी बँक प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सहकार क्षेत्रापासून सामाजिक क्षेत्रापर्यंत करीत असलेल्या बँकेच्या कार्याची दखल अनेकजण घेत असून राष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्रात काम करणार्या बँकिंग फ्रंटियर १९ -२०चा बेस्ट बिझनेस पुरस्कारही बँकेला जाहीर झाला आहे.हा पुरस्कार सोहळा लवकरच गोव्यामध्ये पार पडणार आहे.
बँकेचा पुरस्कार मिळण्यामध्ये बँकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप तांबेकर यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून डॉक्टर चोरगे यांनी तांबेकर यांच्या कामाचे कौतुक केले. सहकार क्षेत्रातील हे पुरस्कार मिळवताना अनेक निकषातून पार पडावे लागते.सध्या राज्यातील सहकार बँकांची अवस्था बिकट आहे.त्यातील तेरा बँका अडचणीत आहेत.मात्र रत्नागिरीसह कोकणातील सर्व सहकारी बँका चांगल्या स्थितीत आहेत.सहकार क्षेत्रात विविध हस्तक्षेपा मुळे वसुलीचे काम मोठे आव्हानात्मक असतात.परंतु रत्नागिरी जिल्हा बँकेची वसुली ९७टक्के झाली आहे. रत्नागिरी बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.राज्य शासनाने जारी केलेल्या पीक कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्हा बँका अडचणीत आल्या तसेच फक्त पिका पुरतीच कर्जमाफी होत असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळाला नाही.रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यातील ८०पैकी २२शाखा स्वतःच्या मालकीच्या असून पुढील पाच वर्षांत उर्वरित शाखा स्वमालकीच्या करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजी जाधव,संचालक डॉक्टर अनिल जोशी, गणेश लाखण,आदेश आंबोळकर,मधुकर टिळेकर,जयवंत जालगावकर,राजेश सुर्वे,संचालिका साै. नेहा माने व कार्यकारी संचालक सुनील गुरव आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com