
* स्त्री*
आयुष्य खुलुन बहरण्या स्त्री जन्म आहे, दवबिंदू जीव, आव्हान पेलणारे हिम आहे.
वाकड्या वाटा तरी ठाम निश्चय आहे,
आकांक्षा अहंकार गिळून सुर्योदय पाहे.
जणू निसर्गाची ही सुंदर मुर्ती,
जाणिवेने ही टिकवणार किर्ती.
क्षेत्र कोणतेही असो उमेदीने सरसावते,
काबीज कसोशीने आणि विश्वासाने करते.
गोड तिखट शब्दांनी संसाराची दोर सांभाळते,
स्वतःच्या अस्तित्वासाठी रौद्र रुप धारण करते.
✒प्रभाकर रुक्मिणी राजाराम कांबळे, रत्नागिरी.