
रत्नागिरी शहर परिसरात ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थासह तीनजण ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
रत्नागिरी शहरातील एकतानगर परिसरातून ४०५ ब्राऊन हेरॉईन अंमली पदार्थाच्या पुड्या व इतर साहित्य असा मिळून १ लाख ४५ हजार ७५० हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी रहुफ इकबाल डोंगरकर (३५) उर्दूस्कूलजवळ कर्ला, रत्नागिरी, नजिर अहमद महंमद वस्ता (३८) वस्ता मोहल्ला राजिवडा, व राहिल अजिज सुवर्णदुर्गकर (२९) रा. राजिवडा बांध या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोर्या यांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने तसेच अवैध व्यवसायावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करण्याबाबत मा. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पथक करून अनेक ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात येत होते. दि. ६.२.२०२५ रोजी एकतानगर भागात हे अंमली पदार्थ विकताना हे आरोपी आढळले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व कॉन्स्टेबल शांताराम झोरे, विजय आंबेकर, दिवराज पाटील, विवेक रसाळ आदींनी यशस्वीरित्या पार पाडली.www.konkantoday.com