पक्षाची जाहीररित्या बदनामी करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल- विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम

शिवसेनाप्रमुखांनी प्रचंड कष्ट करून शिवसेनेची बीजे रोवली आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेऊन ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद सदस्य निवडून आणले आहेत पण निवडून आल्यानंतर कोणी अंतर्गत वादातून किंवा हेवा दाव्यातून पक्ष संघटनेला जाहीररित्या बदनाम करण्याचा प्रयत्न करेल त्या सदस्याला वरिष्ठांना सांगून त्याची हकालपट्टी केली जाईल असा शिवसेनेचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी इशारा दिला आहे संघटनेत बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button