रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कासवांना फ्लिपर टॅग लावण्याचा उपक्रम.
कोकणच्या किनारपट्टीवर विणीसाठी येणार्या सागरी कासवांना फ्लिपर टॅग लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे तेच कासव किती कालावधीनंतर पुन्हा त्याच किनार्यावर विणीसाठी आले याचा अभ्यास यातून होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर आणि सिंधुदुर्गमधील वायंगणी या किनार्यावर मोठ्या संख्येने अंडी घालण्यासाठी येणार्या कासवांना हा टॅग लावण्यात येत आहे.
भारतीय वन्यजीवन संस्थान आणि कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभाग यांच्या माध्यमातून कासवांचे भ्रमण आणि विणीसाठी येणार्या कासवांचे सुरक्षित किनार्यांसाठीचे प्राधान्यक्रम यातून कळून येणार आहेत. कासवांची दीर्घकालीन नोंद ठेवण्यासाठी या टॅगचा महत्वपूर्ण उपयोग होणार आहे.www.konkantoday.com