
रस्त्या नसल्याने ९० वर्षांच्या आजोबांना झोळी करून उपचारासाठी नेण्याची वेळ
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात घडली. रुग्णवाहिका नसल्यामुळे ९०वर्षांच्या आजोबांना लाकडाला झोळी करून नेण्याची वेळ कुटूंबियावर ओढावली आहे.
कावळे गावातील जानकरवाडी इथे ही घटना घडली असून गावातील ९०वर्षीय गोविंद पांडुरंग जानकर यांची काही दिवसाआधी तब्बेत अचानक खालावल्याने त्यांना एका लाकडाला बांधून पाच ते सहा किलोमीटर ग्रामस्थांनी उचलून जंगलातील पायवाटेने मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागले. वेळेत दवाखान्यात नेल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात आला. ३५ते ४० लोकसंख्या असणार्या या वाडीमध्ये रस्ताच नाही.येण्या-जाण्यासाठी या गावातील लोकांना घनदाट जंगलातून पाय वाटेने जावे लागत आहे. वाडीत कुणी आजारी पडले किंवा एखादी दुर्घटना घडली की, लाकडाला झोळी करून किंवा डोली तयार करून न्यावे लागत आहे
www.konkantoday.com