
चालकाला झोप अनावर झाल्याने कंटेनर रस्ता सोडून गटाराच्या बाहेर जाऊन पलटी,करबुडे- निवळी मार्गावर अपघात
करबुडे- निवळी मार्गावर कंटेनर पलटी होऊन मोठया अपघात झाल्याची घटना आज गुरुवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.सविस्तर वृत्त असे की, कंटेनर चालक (जी 06, एव्ही 9643) आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन जयगडहून गोव्याच्या दिशेने जात होता.
यावेळी करबुडे फाट्याजवळ डिझेल भरून गोव्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी चालकाला झोप अनावर झाल्याने कंटेनर रस्ता सोडून गटाराच्या बाहेर जाऊन पलटी झाला. यामध्ये कंटेनरची चाके तुटून रस्त्यावर पडली. कंटेनरची टाकी तुटून मोठा अपघात झाला. या अपघाताच्या मोठया आवाजाने परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. कंटेनर चालक जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले