नागरिकांच्या रेट्यामुळे ठेकेदाराने शेवटी बदलले जुने पाईप

चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत कळंबस्ते मोरीच्या बांधकामात जुने पाईप वापरल्याने हे काम माजी सभापती शौकत मुकादम व ग्रामस्थांनी थांबविले होते. मात्र आता या ठिकाणीची पाईपलाईन बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच लवकरच या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कळंबस्ते येथे एका मोरीसाठी ठेकेदार कंपनी जुनेच पाईप वापरत होती. हे ग्रामस्थांच्या लक्षात येताच मुकादम व अन्य ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते.
याशिवाय महामार्गातील सर्व मोर्‍यांसाठी १२०० मि.मि. चे पाईप वापरण्ययात आले असतानाही येथे १०० मि.मी.चे पाईप वापरण्यात येत होते. त्यामुळे हे पाईपही चालणार नाहीत, असे खडेबोल मुकादम यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सभापती सुर्यकांत खेतले, गजानन महाडीक, दशरथ जाधव, विकास गमरे यांनी सुनावले होते. त्यानंतर हे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता जुने पाईप हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button