
आता राष्ट्रीय महामार्गांचे खासगीकरण करण्याची योजना
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने खाजगीकरणावर भर दिला आहे. तसेच निर्गुंतवणूक धोरणातून कोट्यवधी उभे करायचा मानस केंद्र सरकारचा आहे. रेल्वे आणि बँकांनंतर आता राष्ट्रीय महामार्गांचे खासगीकरण करण्याची योजना तयार करत असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उद्योजकांनी पुढे येऊन या योजनेत गुंतवणूक करून फायदा घेण्याचे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले आहे
www.konkantoday.com