
विधानसभा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांची चंगळ!
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. आमदार म्हणून निवडून यायचे म्हटल्यावर कार्यकर्त्यांची मने राखली जात असून कार्यकर्त्यांची चंगळ चालू आहे. शाकाहारी, मांसाहारी हॉटेल, ढाबे फुल्ल असून यंदाची दिवाळी ही गोड होणार, अशी अपेक्षा मतदारांना आहे. कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना कसरत करावी लागत आहे.*त्यासाठी कार्यकर्त्यांना व्हेज, नॉनव्हेज हॉटेलवर पार्टी दिली जात आहे. सध्या कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ असल्याचे पहावयास मिळत आहे. पुढील दोन-तीन दिवसात दिवाळी सुरू होणार आहे.त्यातच निवडणूक आल्याने विविध पक्षाच्या उमेदवाराच्या माध्यमातून आपली दिवाळी गोड होणार, अशी अपेक्षा मतदारांना आहे. विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत असून इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.अनेक उमेदवारांनी गावागावात गावभेट दौरे सुरू केले असून दिवसभर दौऱ्यात सहभागी झालेले कार्यकर्ते रात्रीच्या वेळी हॉटेल धाब्यांवर गर्दी करत असून आपलाच उमेदवार निवडून येणार, असे ठामपणे सांगत आहे.कार्यकर्त्याकडून मुख्यत्वे करून नॉनव्हेज जेवणाचे नियोजन केले जात असून चिकन, मटन, बिर्याणीला अधिक पसंती मिळत आहे. तर कार्यकर्त्यांकडून अनेक मतदारांच्या मुलांना नोकरीचे, कामधंद्याचे आश्वासन दिले जात आहे.*लक्ष्मीदर्शन…*रात्रीच्या वेळी ढाबा, हॉटेल याच्यावर कार्यकर्त्यांची गर्दी पहावयास मिळत असून पुढे होणाऱ्या निवडणुकीचे नियोजन आखले जात आहे. दिवाळी जवळ आल्याने व निवडणुकीमुळे अनेक मतदारांची दिवाळी गोड होणार आहे. अनेक उमेदवाराकडून दिवाळीनिमित्त भेटवस्तू किंवा लक्ष्मी दर्शन होण्याची शक्यता असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.