अजित पवार शरद पवारांच्या दालनात , बंद दाराआड केली चर्चा.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. अलीकडेच शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर दिसले होते. बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार काका पुतणे एकत्र आले होते.यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, त्याच मंच्यावर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातही संवाद झाला होती. दोघींच्या खुर्च्या एकमेकांशेजारी होत्या. दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या अनुषंगाने ती मोठी घडामोड मानली जात होती.यानंतर आता आजही अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी घाई घाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात अजित पवार ‘प्रेसिडेंट’ असं लिहिल्याला खोलीत शिरताना दिसत आहे. घाईघाईत त्यांनी पीएसोबत केलेला संवाद देखीलसमोर आला आहे.संबंधित व्हिडीओत अजित पवार घाईघाईत चालत येताना दिसत आहेत. आल्यानंतर ते ‘कुठे बसायचं रे’ असं पीएला विचारताना दिसत आहेत. यावर ‘साहेब इकडे आत बसलेत’ असं पीएने सांगितल्यावर अजित पवार प्रेसिडेंट बोर्ड लावलेल्या दरवाज्यातून आतमध्ये शिरले. यानंतर याच दालनात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button