
*आता जिल्ह्यातील औदयोगिक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अत्यंत वेगवान पद्धतीने होणार*
___आता जिल्ह्यातील औदयोगिक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अत्यंत वेगवान पद्धतीने होणार आहे. कारण महावितरण रत्नागिरी कार्यालयाकडून स्वागत सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलची स्थापना औद्योगिक ग्राहकांसाठी करण्यात आली आहे.राज्यस्तरावरून महावितरणच्या परिपत्रकाप्रमाणे अशा औद्योगिक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण वेगाने करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातही स्वागत सेलची स्थापना करण्यात आली आहे. राज्यस्तरावर महावितरणकडून ग्राहकांच्या दृष्टीने एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. स्वागत सेल परिपत्रक १ जानेवारी २०२४ रोजी काढण्यात आले होते. या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वागत कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वागत कक्षामार्फत जिल्ह्यातील सर्व नवीन जोडण्या देण्याचे काम वेळेवर होते की नाही हे तपासले जाणार असून त्याचबरोबर ग्राहकांच्या सर्व तक्रारींची नोंद वेळेवर घेतली जाार आहे. याशिवाय त्वरित ग्राहकांशी फोनवर बोलले जाणार असून आणि तक्रारींचे निवारण विनियमनानुसार विहित मुदतीत करून त्या ग्राहकांना त्याची माहिती देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या बाबी या परिपत्रकाद्वारे सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. यानुसार जिल्ह्यात ५ जानेवारी २०२४ रोजीच्या महावितरण रत्नागिरी कार्यालय यांच्या निर्देशाप्रमाणे या स्वागत स्थापना करण्यात आली आहे. www.konkantoday.com