
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुडन्यूज.
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुडन्यूज असून, आता एसटीचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होण्यासाठी परिवहन मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5 हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे.यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे बसेसची संख्या वाढणार असून, एसटी बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांवर बससाठी वाट पाहात ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही. तसेच बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची गर्दी देखील नियंत्रीत होणार आहे.