
*राज्यातील शाळेत नॉनटिचिंग ‘हॅपी सॅटर्डे’ संकल्पना राबवणार: केसरकर*
_शालेय शिक्षण घेताना मुलांसाठी “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राज्यात राबविण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत मुलांना अभ्यास वगळून दर शनिवारी संगीत, नाट्य, कला याचे शिक्षण तज्ञ व प्रतिथयश कलाकारांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.सावंतवाडी येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी झाला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.www.konkantoday.com