
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे भरदिवसा घरफोडी, दोन लाखाचा मुद्देमाल चोरीस.
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे गुरूवारी सकाळी १०.३० ते सायं. ६.३० च्या मुदतीत घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.संतोष शंकर रिळकर (५३) यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यांचे वरील ठिकाणी घर आहे.
चोरट्याने लोखंडी पहार व कोयतीच्या सहाय्याने पाठिमागील लोखंडी दरवाजाची जाळी कापत दरवाजा उघडला. त्यानंतर लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. देवघरात असलेली लोखंडी कपाटातील एक सोन्याची चेन, ३५ ग्रॅम वजनाचे मोठे मंगळसूत्र, १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार व ३८ हजार रुपयांची रोकड असा १ हजार ८८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.www.konkantoday.com