मंडणगड तालुक्यातील कादवण-बौद्धवाडीतील शेपाली व सेजल या जुळ्या बहिणींनी महानगरात बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटविला

मंडणगड तालुक्यातील कादवण-बौद्धवाडीतील शेपाली व सेजल या जुळ्या बहिणींनी महानगरात बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटविला असून, जिल्हा, राज्य व देश पातळीवर १६ स्पर्धा खेळून १४ सुवर्णपदके, सहा रौप्य, ११ कांस्यपदके पटकावली आहेत. दोन्ही बहिणींनी आता राज्यात आपला दबदबा निर्माण केला असून, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करीत या जुळ्या खैरे भगिनींनी विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे.
तालुक्यातील कादवण-बौद्धवाडी गावचे रहिवासी असणारे आनंद खैरे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासह मुंबईतील गोवंडी भागात राहतात. आनंद यांना तीन मुली व मुलगा आहे. दोघीही तेरावीमध्ये शिक्षण घेत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button