राजापूर तालुक्यातील नवेदर लोणवीवाडी येथेघरा लगत रचून ठेवलेल्या लाकूड सामानाच्या खालीमृत अवस्थेत बिबट्या सापडला


राजापूर तालुक्यातील नवेदर लोणवीवाडी येथे सुगंधा सदाशिव बावकर यांच्या राहत्या घरा लगत रचून ठेवलेल्या लाकूड सामानाच्या खाली मरण पावलेला बिबट्या काल रात्री आढळून आला आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित बिबट्याचा उपासमारीने सुमारे तीन – चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत वन विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोनवीवाडी येथील सुगंधा सदाशिव बावकर यांचे राहते घराच्या भिंतीलगत रचून ठेवलेल्या लाकूड सामानाच्या खाली बिबट्याचा बछडा मृत झाल्याची माहिती पोलीस पाटीलांमार्फत राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे आणि सहकारयांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्याठिकाणी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी मृत बिबट्याच्या बछड्यास ताब्यात घेवून राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करून घेतली. सदर बिबट्याचा मृत्यू हा उपासमारीने झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button