कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्राच्या किनाऱ्यावर स्फोट, १०० हून अधिक प्रवासी करत होते प्रवास, पहा व्हिडिओ!

कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी विमान क्रॅश होऊन मोठा अपघात झाला आहे. समुद्र किनाऱ्याच्या जवळ हे विमान क्रॅश झालं. स्फोटाचा व्हिडीओही समोर आला आहे. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक बिघाड जाल्यानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना केली होती. मात्र पुढे हे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अजरबाईजन एअरलाईनचं हे विमान होतं. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.अजरबाईजन एअर लाईन्सचं हे म्हणणं आहे की ज्या विमानाचा अपघात झाला त्याचा क्रमांक J2-8243 असा होता.

बाकू पासून ग्रॉन्जी हवाई मार्गावर तातडीने या विमानाचं लँडिंग करावं लागलं. अक्ताऊपासून तीन किमी अंतरावर लँडिंग करत असतानाच विमान दुर्घटनाग्रस्त झालं. TASS या रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीसुरा हे विमान मखाचाकलाच्या दिशेने वळवण्यात आलं होतं. विमानाचा अपघात झाल्यानंतर सदर ठिकाणी ५२ फायरफायटर्स आणि ११ बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button