
शहरानजीकच्या शिरगाव गांजुर्डा परिसरात वृद्धाची झाडाला गळफास लावून आत्महत्या
सायंकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या वृद्धाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शहरनजीकच्या शिरगाव गांजुर्डा परिसरात घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजाराम कृष्णा धुळप (७३, रा. परटवणे रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
www.konkantoday.com