संविधानाचा संस्कृतमधील अनुवाद रत्नागिरीसाठी अभिमानास्पद.
राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. या अनुवादाच्या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा होता. यात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीनंद बापट आणि डेक्कन कॉलेजचे भव शर्मा या दोन पुणेकरांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.राज्यघटनेचा संस्कृत अनुवाद तिसर्यांदा करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील संस्कृत विद्यापीठ उपकेंद्राच्यादृष्टीनेही ही बाब अभिमानास्पद मानली जात आहे. www.konkantoday.com