आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या बारामती ॲग्रो या संस्थेतर्फे मंगळवारी खेड शहरातील पूरग्रस्तांसाठी केली मदत

कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या बारामती ॲग्रो या संस्थेतर्फे मंगळवारी खेड शहरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला. यावेळी आमदार योगेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारपासून कोकण दौरा सुरू केला. खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी रोहित पवार व आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेडमधील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button