दापोली पोलिसांना मिळणार सुसज्ज सदनिका
दापोली पोलिसांची वसाहतीची भरपूर दिवसांची असणारी मागणी आता पूर्णत्वाला जाणार आहे. दापोली पोलिसांच्या ४६ सदनिका असणार्या दोन पाच मजली इमारतीच्या कामाचा नुकताच शुभारंभ झाला आहे. यामुळे दापोली पोलिसांना आता आपले हक्काचे व सुसज्ज घर उपलब्ध होणार आहे. याकरिता आमदार योगेश कदम यांनी प्रयत्न केले.दापोली पोलीस ठाणे व पोलीस वसाहत ही इंग्रजांच्या काळात बांधलेल्य इमारती होत्या. या इमारती फारच जीर्ण झालेल्या होत्या. यामुळ या वसाहतीत पोलिसांना राहणे कठीण झाले होते. यामुळे अनेक पोलीस अधिकारी शहरात भाड्याने घर अथवा फ्लॅट घेवून रहात होते. याशिवाय पोलीस कर्मचारीदेखील शहरात रहात होते.
त्यातच दापोली पोलीस स्थानकाची इमारत सुमारे दोन वर्षापूर्वी अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यानंतर या इमारतीचे काम पूर्ण होवून त्यात पुन्हा पोलीस स्थानक स्थानकाचे कामकाज सुरू झाले. मात्र पोलिसांच्या निवास्थानाचे काम मागे पडले होते. या पोलीस स्थानकाच्या बाजूला एक सभागृह बांधण्यात आले होते.
या सभागृहात त्यावेळी तात्पुरती पोलीस स्थानकाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता नव्याने बांधण्यात येणार्या पोलीस वसाहतीकरिता ते सभागूह देखील जमीनदोस्त करण्यात आलेले आहे. आता या जागी पोलीस कर्मचार्यांच्या प्रत्येकी २३ सदनिका असणार्या पाच मजली दोन इमारती उभ्या राहणार आहेत. www.konkantoday.com