
कोरोना योद्ध्यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट देण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. केंद्र आणि राज्य शासन कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवत आहे.महिनाभर नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी. तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने खासदार विनायक राऊत यांनी स्पेशल क्वालिटीच्या पीपीई किट उपलब्ध केल्या आहेत.
www.konkantoday.com