‘मी ३५ वर्षे दुसऱ्यांसाठी मतं मागितली, पण पहिल्यांदाच स्वत:साठी….’, प्रियंका गांधींचं वायनाडकरांना भावनिक आवाहन!
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज (२३ ऑक्टोबर) प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्जही दाखल करत त्यांनी वायनाडमध्ये प्रचारालाही सुरुवात केली आहे. मतदारसंघात विविध ठिकाणी जाऊन त्या लोकांशी संवाद साधत आहेत.*प्रियंका गांधी यांचा उमेदवारी आज अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी काँग्रेसकडून मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीनंतर प्रियंका गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘मी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये प्रचार करत जवळपास ३५ वर्षे दुसऱ्यांसाठी मतं मागितली आहेत. पण आता पहिल्यांदाच स्वत:साठी मतं मागत आहे’, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी वायनाडच्या जनतेला भावनिक आवाहन केलं.*प्रियंका गांधींच्या विरोधात उमेदवार कोण?*वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियंका गांधी या पहिल्यांदा निवडणूक लढवत असल्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे, तर प्रियंका गांधींच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नव्या हरिदास या निवडणूक लढवत आहेत. नव्या हरिदास या सॉफ्टवेअर इंजिनीयर असून याआधी त्यांनी नगरसेवक पदावर काम केलेलं आहे. नव्या हरिदास यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षानेही प्रचाराला सुरुवात केली आहे.#WATCH | Kerala: Addressing a public rally in Wayanad, Congress candidate Priyanka Gandhi Vadra says, “It has been 35 years that I have been campaigning for different elections. This is the first time I am campaigning for your support for myself…”(Source: Indian National… pic.twitter.com/wq6Up4s3Fh— ANI (@ANI) October 23, 2024*वायनाडमध्ये पोटनिवडणूक का होत आहे?*काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. या दोन्हीही मतदारसंघातून राहुल गांधी निवडून आले होते. त्यामुळे नियमानुसार, राहुल गांधींनी एक मतदारसंघ सोडत वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वायनाडीची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे.