
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सिने-नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.मागील तीन वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात आले नव्हते.मांटुगा-माहीम येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात १४ जूनला होणाऱ्या गो. ब. देवल पुरस्कार समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.