
डीबीजे महाविद्यालयातील तन्वी रेडीजने भारताला मिळवून दिले सुवर्णपदक.
डीबीजे महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील प्रथम सत्रात शिक्षण घेत असलेल्या तन्वी भूषण रेडीजने एशियन योगासन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ढोल-ताशांच्या गजरात तन्वीचे आगमन होताच जोरदारपणे स्वागत करण्यात आले. भारतीय योगासन संघटनेने नुकतेच एशियन योगासन स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत १६ देशाचा समावेश होता. महत्वपूर्ण कामगिरी करून तन्वीने भारताला सुवर्णपदक प्राप्त करुन दिले. तन्वीने ३ वेळा खेलो इंडिया सहभाग नोंदवून महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. याबरोबरच उत्तराखंड येथे पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक तिने पटकावले. कोकणच्या या कन्येने केलेल्या कामगिरीबद्दल तिला ’डीबीजे अभिमान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवार तन्वीची शहरातील मळ्यातील गणपती ते डीबीजे महाविद्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. यावेळी नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्यावतीने संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश केशव जोशी, व्हा. चेअरमन डॉ. दीपक विखारे, सचिव अतुल चितळे, खजिनदार संजीव खरे, नियामक समिती सदस्य सुचय रेडीज, फैसल कास्कर, माधव टिकेकर, मकरंद साठे, तन्वीचे कुटुंबिय, प्रशिक्षक रणवीर सावंत, शांताराम जोशी, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक मिनल ओक, प्रशांत देवळेकर उपस्थित होते. चेअरमन मंगेश तांबे यांनी मनोगतात या आठवड्यात दोन महत्वपूर्ण यश आपल्याला मिळाले असून त्यापैकी सिद्धार्थ जैनचे युपीएससी परीक्षेत यश तर तन्वीचे भारताला प्राप्त करुन सुवर्णपदक. चिपळूण ही क्रीडा व सांस्कृतिक राजधानी असल्याचे तन्वीच्या सुवर्णपदकाने पुन्हा एकदा सिद्ध करुन दिल्याचे नमूद केले. तत्वीचे आई-वडील, प्रशिक्षक यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ आर.एम.मोरे, वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना प्रमुख डॉ. सम्राट माने, कनिष्ठ महाविद्यालयीन जिमखाना प्रमुख प्रा.विलास जोशी, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी उपस्थित होते.www.konkantoday.com