
खेड तालुक्यातील नातूनगर मोहल्ला येथे घरफोडी, ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला.
खेड तालुक्यातील नातूनगर मोहल्ला येथे अज्ञाताने घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले ४ लाख १ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत मुस्ताक सिराज कोंडेकर (मूळ रा. नातूनगर, सध्या रा. डाकबंगला खेड) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मुस्ताक कोंडेकर हे शहरातील डाकबंगला येथील जबल अलनूर इमारतीतील २०२ खोलीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचे नातूनगर मोहल्ला येथील घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.www.konkantoday.com