रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडे

रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांची नाशिक महानगरपालिकेत उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बदली आदेशाची प्रत मिळताच ठोंबरे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा कार्यभार स्विकारला आहे. जिल्हा स्तरावरील रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारीपद रिक्त राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. चिपळूणचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडे रत्नागिरी पालिकेचे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button