
मुंबईत लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू.
मुंबईत लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. मृत तरुण मुंबई लोकलच्या दरवाजाजवळ उभा होता.मात्र, गर्दीमुळे अचानक त्याचा हात सटकला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली.आयुष जतीन दोशी (वय, २०) असे धावत्या लोकलमधून पडल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरातील मधुकुंज सोसायटीत कुटुंबासह राहत होता.