मेळघाट परिसराच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करणार-उद्योग मंत्री उदय सामंत.

अमरावती, : मेळघाट परिसराच्या विकासासाठी वाव आहे. राज्य शासनाकडून यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. शासनाच्या योजना या भागात प्रभावीपणे राबवून मेळघाट परिसराच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.मेळघाट परिसरातील 707 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज धारणी येथे करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, आमदार राजकुमार पटेल आदी उपस्थित होते.श्री. सामंत म्हणाले, मेळघाट परिसराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. या भागाचा विकास व्हावा यासाठी आमदार पटेल यांनी सुचविलेले कामे करण्यात येत आहे. तसेच आवश्यक असलेल्या विकास कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच विकास कामे करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. या परिसराला एक संवेदनशील व्यक्तिमत्व नेतृत्व लाभले असल्याने या भागाचा कायापालट करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.श्री. जाधव यांनी, महिला शेतकरी आणि सर्व घटकांसाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात या परिसरात विविध विकासकामे करण्यात आली आहे. यात लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांना अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास यासह आशा सेविका, पोलीस पाटील यांचे मानधन वाढविण्यात आले आहे. बचत गट आणि मातृत्व योजनेतून महिलांना सहकार्य करण्यात आले आहे. शेतकरी सन्मान योजनेतून दरवर्षाला 12 हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. तसेच पिक विम्याची रक्कम वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. येत्या काळात सर्व ठिकाणी आरोग्य सुविधा, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याने या भागाचे चित्र बदलणार आहे.यावेळी श्री. अडसूळ यांनी अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी कार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमात आमदार राजकुमार पटेल, बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांनी मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी सेविका, पोलिस पाटिल, रोजगार सेवक आणि लाडकी बहिण लाभार्थीचा सत्कार करण्यात आला.0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button