
शिवसृष्टीला पर्यटक वाढले परंतु नव्याने समस्या निर्माण.
रत्नागिरी शहरातील पश्चिमेकडील रत्नदुर्ग किल्ला नुकत्याच उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीमुळे राज्यासह देशात प्रसिद्ध झाला आहे. दररोज हजारो पर्यटक भगवती देवीचे दर्शन आणि शिवसृष्टी पाहण्यासाठी येत आहेत येथे येणार्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, या पर्यटकांकडून कचरा सर्वत्र टाकण्यात येत असल्याने शिवसृष्टी वगळता अन्य परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. नगर परिषदेने बसवलेल्या कचराकुंड्याही ओसंडून वाहत आहेत. एक शांत ठिकाण म्हणून रत्नदुर्ग किल्ल्याची ओळख आहे. रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्याचा परिसर रमणीय असल्यामुळे येथे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.www.konkantoday.com