सैतवडे ग्रामपंचायत टिबीमुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित रत्नागिरी: जमीर खलफे
रत्नागिरी जिल्यात एकूण ४२ ग्रामपंचायतीना टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे ग्रामपंचायतीला देखील टिबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 09 ऑक्टोबर 2024 रोजी टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी श्री कीर्ती किरण पुजार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री राहुल देसाई , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी डॉ. ज्योत्स्ना वाघमारे, फिनोलेक्स कंपनीचे मॅनेजर श्रीदत्त अलगुरु, वैद्यकीय अधिकारी फिनॉलेक्स डॉ. अनुप करमरकर व सर्व NTEP कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तेजस परपोलकर यांनी केली. सैतवडे ग्रामपंचायतीचे सरपंच साजिद लियाकत शेकासन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळीग्रामपंचायत अधिकारी कैलाश विष्णु कोकणी आणि CHO धनश्री पावरी उपस्थित होत्या.