चिपळूण व्यापारी महासंघाने शुक्रवारपासून बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला
चिपळूण महापूर ओसरल्यानंतर काही दिवसांतच येथील काही व्यापाऱ्यांनी भिजलेल्या कपड्यांसह अन्य साहित्याचे सेल सुरू केले. खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने बाजारपेठेत मदत कार्यासाठी आलेल्या यंत्रणेला अडथळा होऊ लागला. या पार्श्वभूमीवर येथील व्यापारी महासंघाने शुक्रवारपासून बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील सर्व मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून सील करण्यात आला आहे.
www.konkantody.com