
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे डॉ. तोरल शिंदे, सुरेखा पाथरे, व सुनिता गोगटे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार जाहीर.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) स्वरूप योगिनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीतील स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल शिंदे, दिव्यांगांसाठी कार्यरत आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे आणि उद्योजिका सुनिता गोगटे यांची निवड करण्यात आली आहे.३ ते ५ ऑक्टोबरला होणार्या स्वरूपानंद व्याख्यानमालेदरम्यान या पुरस्कारांचे वितरण शहरातील वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात करण्यात येणार आहे. स्वरूपानंद व्याख्यानमालेत गुरूवारी ३ सायंकाळी ५.४५ वाजता नामयाची जनी (संत जनाबाई समाधी ६७५ वे वर्ष) ४ रोजी पुण्यश्लोक महाराणी (अहिल्यादेवी होळकर यांचे जन्माचे त्रिशतकी वर्ष) ५ रोजी वीरांगना महाराणी दुर्गावती (महाराणी दुर्गावतीच्या ५०० व्या जन्मवर्षाची सांगता) यावर श्रीनिवास पेंडसे व्याख्यान देणार आहेत. पहिल्या दिवशी डॉ. शिंदे, दुसर्या दिवशी श्रीमती पाथरे व तिसर्या दिवशी गोगटे यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.www.konkantoday.com