
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरावर तिरंगा विद्युत रोषणाई
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक व नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे मंदिर परिसर देशभक्तीच्या वातावरणाने उजळून निघाला आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिराचा आतील व बाहेरील परिसर तसेच श्री संत नामदेव पायरी येथे तिरंग्याच्या रंगसंगतीत विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, वेदांता – व्हिडिओकॉन भक्त निवास आदी ठिकाणीही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे




