
चिपळूण शहरात दुचाकी व टेम्पो अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू
चिपळूण शहरात दुचाकी व टेम्पो अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
चिपळूण शहरातील पागनाका येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आयशर ट्रक व दुचाकीमध्ये समोरासमोर अपघातात झाला .विशाल शंकर शिंदे (३५, पाटण, सध्या कापसाळ, चिपळूण) असे गंभीर जखमी झाला होता. देवगडहून मुंबईकडे निघालेल्या आयशर ट्रकची पागनाका येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये विशाल शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो जागीच बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ कामथे रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले विशाल शिंदे हा चिपळूण आगारात एसटी चालक म्हणून काम करतो. कापसाळ येथील यामा शोरूम नजीक राहतो. या घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचाऱ्यांनीही कामथे रुग्णालयाकडे धाव घेतली.
www.konkantoday.com




