
महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन कॉंग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नाटे येथील नुईद शब्बीर काझी यांची नियुक्ती.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन कॉंग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नाटे येथील नुईद शब्बीर काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश फिशरमन कॉंग्रेसची बैठक मंगळवारी कुलाबा येथील राजीव गांधी भवन येथे पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय फिशरमन कॉंग्रेसचे अध्यक्ष रामदास संघे, फिशरमन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हाध्यक्ष चिंतामणी मकु आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रांताध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मान्यतेनुसार रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नुईद काझी यांची नियुक्ती करण्यात आली. www.konkantoday.com