
युरिया खताचा शेतकर्यांना वेळेत पुरवठा व्हावा -प्रशांत यादव यांची मागणी.
निसर्गातील बदलांमुळे आधीच शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. तर दुसरीकडे सध्या शेतकर्यांना गरज असतानाही युरिया खताचा येथे तुटवडा भासत आहे. तरी कृषि विभागाने शेतकर्यांना वेळेत खताचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी रत्नागिरी जिल्हा कृषि अधिक्षक डॉ. शिवकुमार सदाफुले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.www.konkantoday.com