पुण्याच्या कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवला आणि नंतर मिळालाही.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आज पुण्यातील कार्यक्रमादरम्यान मोबाईल हरवला म्हणजेच गहाळ झाला. मात्र, काही वेळाने तो सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला उदय सामंत उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचा फोन हरवला आहे, कोणाला सापडला असल्यास त्याने आणून द्यावा असं जाहीर करण्यात आलं. यानंतर काही वेळातच सामंत यांना त्यांचा फोन मिळाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेला उदय सामंत यांनी स्वतः देखील दुजोरा दिला असून मोबाईल सापडला असल्याची माहिती सुद्धा दिली आहे.