निर्लेखित जडसंग्रह साहित्य विक्रीसाठी इच्छुकांनी १० ऑक्टोबरपर्यंत दरपत्रके द्यावीत रत्नागिरी, दि. २४ (जिमाका) : मुख्याध्यापक, शासकिय तांत्रिक विद्यालय, रत्नागिरी, भाटे पूला नजिक, राजिवडा, या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पध्दतीने विक्री करावयाची असून इच्छुकांनी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दरपत्रक सिलबंद लिफाफ्यात पाठवावी, असे आवाहन शासकीय तांत्रिक विद्यालय/केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालय, राजिवडाचे मुख्याध्यापकांनी केले आहे.

निविदेच्या बंद लिफाफ्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वा. नंतर आलेल्या निविदांच्या स्वीकार केला जाणार नाही. निविदा दि.११ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उघडण्यात येतील. विक्री करावयाचे निर्लेखित जडसंग्रह साहित्य कार्यालयात दिनांक २६ सप्टेंबर पासून शनिवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० वा. ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाहता येईल. निर्लेखित जडसंग्रह साहित्य हे आहे त्या स्थितीत आपल्या स्वखर्चाने नेण्याची व्यवस्था करावी. ज्या खरेदीदाराच्या साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदरहू साहित्याची विक्री केली जाईल. ज्यांचा दर मंजूर होईल त्यांना ताबडतोब योग्य रक्कम भरून साहित्य स्वखर्चाने घेवून जावे लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा, विक्री रद्द करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार निम्नस्वाक्षरीकारांनी राखून ठेवले आहेत. निवेदेत भाग घेणाऱ्याने आपले पॅनकार्ड, आस्थापना नोंदणी पत्र, जीएसटी प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे निविदेबरोबर जमा करावयाची आहेत. निविदाकाराने निविदा सादर करण्याच्या दिवसापर्यंत आपण शासनाकडे कोणत्याही स्वरुपाच्या काळया यादी समावेश न झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. आपण निविदेत नमुद केलेले दर हे पुढील तीन महिन्यांकरीता म्हणजेच जानेवारी २०२५ पर्यंत आपणांवर बंधनकारक रहाणार आहेत, याची नोंद घ्यावयाची आहे. दरपत्रक उघडण्याचे ठिकाण शासकिय तांत्रीक विदयालय, भाटये पुलाजवळ, राजिवडा, रत्नागिरी यांचे कक्ष हे राहील. दरपत्रक मोहोरबंद लिफाफ्यात सादर करावे, त्यावर ठळक अक्षरात निर्लेखित हत्यारे व उपकरणे यांकरीता निविदा असे नमुद करावे. काही प्रशासकिय अडचणींमुळे दरपत्रक / निवीदा रलेल्या दिनांकास उघडता न आल्यास नजिकच्या पुढील दिनांकास उघडण्यात येतील. अधिक माहितीसाठी प्र. मुख्याध्यापक संतोष गारटे, ९८५००२९५५७ व श्री. प्र.भांडारपाल कुंदन आमरे, ९४२११४३१६९ यांच्याशी संपर्क साधावा.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button