“कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा व कांचन मालगुंडकरांचे मान्यवरांकडून विशेष कौतुक!”.
यंदाच्या 5 व्या वर्षीचा पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात संपन्न
विजेत्यांकडून गणपती बाप्पाचा जोरदार जयघोष
वितरण समारंभादरम्यान रंगला खेळ पैठणीचा. रत्नागिरी :- रत्नागिरीत गणेशभक्तांत लोकप्रिय झालेली “कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा” ही आज रत्नागिरीतीला एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा ठरली आहे. यंदा पाचव्या वर्षी या स्पर्धेचा 5 तालुक्यांत विस्तार झालाय. या स्पर्धेचे परीक्षण व निकाल गणेशोत्सव काळातच त्वरित लावण्यात येतो, या सर्व बाबी विशेष आहेत. या स्पर्धेचे आयोजक कांचन मालगुंडकर यांची ही संकल्पना निश्चितच वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोदगार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी काढले. सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. जयेश मंगल पार्क येथे 21 सप्टेंबर रोजी संकष्टीच्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.याचबरोबर रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक प्रसन्न आंबुलकर, भंडारी समाज तालुकाध्यक्ष राजू कीर, प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक गणेश धुरी, राजू घाग, प्रवीण जैन, सौरभ मलुष्टे, यांनीही कांचन मालगुंडकर यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच स्पर्धेची व परीक्षणाची विशेष प्रशंसा केली. प्रस्तावनेत कांचन मालगुंडकर यांनी स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी परीक्षकांतर्फे अभिजीत नांदगावकर, विजय पाडावे, पाटील सर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला राजापूरचे प्रसिद्ध फोटोग्राफर चारुदत्त नाखरे व कलीम मुल्ला देवरुख चे बाळकृष्ण चव्हाण आणि लांजाच्या अपर्णा हळदणकर हे उपस्थित होतेपारितोषिक वितरण समारंभावेळी विजेत्यांनी गणपती बाप्पाचा जोरदार जयघोष केला. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले. प्रथम, द्वितीय, तृतीय, विशेष उल्लेखनीय, उत्तेजनार्थ, प्रोत्साहनपर अशा सर्व विजेत्यांना रोख रक्कम, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. *रत्नागिरी तालुका निकाल*-: प्रथम क्र. : आशिष अविनाश वाडकर (13 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र), द्वितीय क्र. : चारुदत्त धालवलकर (9 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र), तृतीय क्र. : घाटकर परिवार (6 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र).*लांजा तालुका निकाल* -: प्रथम क्र. : अजय आग्रे (5हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र), द्वितीय क्र. : मोहन तोडकरी (3 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र), तृतीय क्र. : अवधूत कीर (2 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र) *राजापूर तालुका निकाल* -: प्रथम क्र. : अनिल नार्वेकर (5हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र), द्वितीय क्र. : बाणे गुरुजी (3 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र), तृतीय क्र. : रामचंद्र पिठलेकर (2 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र) *संगमेश्वर देवरुख तालुका* -: प्रथम क्र. : विजय तळेकर (5हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र), द्वितीय क्र. : चंद्रकांत खाके (3 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र), तृतीय क्र. : गणेश साळवी (2 हजार, ट्रॉफी, सन्मानपत्र). याशिवाय विशेष उल्लेखनीय, उत्तेजनार्थ, प्रोत्साहन पर बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे हिने केले. नियोजनात शकील गवाणकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.🔸 *7 व्या थरावर चढणाऱ्या मुलीचा खास सत्कार*पारितोषिक वितरण कार्यक्रमात दहीहंडी उत्सवात 7 व्या थरावर चढून सलामी देणाऱ्या अन्वी दीपक कोळगे धाडसी कन्येचा मान्यवरांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. मान्यवरांनीही या मुलीच्या धाडसाचे कौतुक केले.🔸 *रंगला खेळ पैठणीचा*पारितोषिक वितरण समारंभाआधी “भावभक्तीचा-खेळ पैठणीचा” हा खास महिलांसाठी आकर्षणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये महिलांनी बहुसंख्येने सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम खूपच रंगतदार केला. सूत्रसंचालक प्रथमेश साळवी यांनी हा कार्यक्रम कौशल्य दाखवत, विविध खेळ घेत उत्तरोत्तर अधिक रंगतदार केला. या स्पर्धेत एकूण 10 विजेत्या महिलांतून अंतिम फेरीत विजेती व उपविजेती महिला निवडण्यात आली.