
आठ लाखाचा धनादेश स्वीकारून रक्कम परत केली नाही, दोघांकडून फसवणूक खेडमधील प्रकार
धनादेशाद्वारे ८ लाख रुपयांची रक्कम स्वीकारत रकमेसह परताव्याची रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जून ते २० सप्टेंबर २०२२ या कालावधीत येथील महावितरण विभागात घडल्याचे धनवंत विठ्ठल जाधव (५३) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
सचिन धनाजी राऊत, नंदकुमार चौगुले अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी फिर्यादीकडून ८ लाख रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले होते. फिर्यादीने परताव्याची मागणी करूनही परत न केल्याने फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे.
www.konkantoday.com