
त्या जहाजावरील पाचवा कर्मचारी देखील कोरोनाग्रस्त
जयगड येथे दुरुस्तीसाठी आलेल्या जहाजातील कर्मचाऱ्यांपैकी आणखी एका कर्मचाऱयांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे जयगड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या जहाजातील या कर्मचाऱयांचे स्वॅप घेण्यात आल्यानंतर हे कर्मचारी गणपतीपुळे येथील एका हॉटेलमध्ये कोरन्टाइन झाले होते यातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यावेळी एका कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव आला होता परंतु या कर्मचाऱयाला दक्षता म्हणून दामले स्कूलमध्ये कोरन्टाइन करण्यात आले होते त्याचा अहवाल परत घेतल्यानंतर त्याचा अहवाल आता पॉझिटिव्ह आहे
www.konkantoday.com