
रिफायनरी समर्थक व विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटणार
महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने राजापुरात येणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाणार येथील रिफायनरी प्रकल्प अन्य ठिकाणी जाऊ नये म्हणून रिफायनरी समर्थकांच्यावतीने पत्र देण्यात येणार आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने हे पत्र देण्यात येणार आहे.याशिवाय मुख्यमंत्र्यांचे बॅनरद्वारे ही स्वागत केले जाणार आहे. रिफायनरी विरोधकांकडूनही ही रिफायनरी रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करणारे पत्र देण्यात येणार आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने रिफायनरी समर्थक व विरोधक एकमेकांसमोर परत ठाकले आहेत.
www.konkantoday.com