
आरटीओकडून या १२ बसवर दंडात्मक कारवाई करून ४१ हजार रुपये दंड वसूल
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरु झाली असून मात्र याचा गैर फायदा घेत गावी जाणाऱ्या या प्रवाशांकडून खासगी बस चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवशांची लुटमार करीत असतात.मागील तीन दिवसांपासून आरटीओने महामार्गवर खासगी बसची तपासणी सुरू केली असून २७ पैकी १२ बस धारक निश्चित केलेल्या दरापेक्षा अतिरिक्त भाडे आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आरटीओकडून या १२ बसवर दंडात्मक कारवाई करून ४१ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
सण- उत्सवात मुंबई, उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक गावी जात असतात. गौरी-गणपती सणात संख्या अधिक वाढते. विशेषतः कोकणात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्यामुळे जास्त लोक कोकणात जातात मात्र गरजू प्रवाशांची संख्या पाहता खासगी बसंचालक मालक गेल्या काही वर्षांपासून सणांच्या तोंडावर पुरेपूर फायदा घेत आहेत. ऐन सणासुदीला हे खासगी बस धारक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करतात. मात्र अशा या लूटमारीला आता आळा घालण्यासाठी वाशी उप प्रादेशिक कार्यालयाची या बसेसवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.
www.konkantoday.com